आरवली श्री देव वेतोबाचा आज जत्रोत्सव  
सिंधुदुर्ग

Vetoba Jatra : आरवली श्री देव वेतोबाचा आज जत्रोत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर बहरणार

पुढारी वृत्तसेवा

आरवली : दक्षिण कोकणचा तिरूपती आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ओळख असलेले आरवली गावचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 21 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे .

उत्सवात मंदिरात सकाळी सालांकृत पाद्यपूजा, वेतोबा दर्शन, नवसफेड, दुपारी महाप्रसाद, सकाळपासून देवाला केळी ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. श्री देव वेतोबाला केळ्यांच्या घडांचा नवस केला जातो. त्यामुळे मंदिराच्या दर्शनी भागात केळ्यांचे घड विक्रीस ठेवले जातात. या देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सिंधुदूर्ग जिल्हा, गोवा, मुंबई , गुजरात, कोल्हापूर, पुणे आदी भागातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना देवाचे दर्शन घेणे सोपे जावे म्हणून आरवली देवस्थान कमिटी, गांवकर, मानकरी व ग्रामस्थ विविध रांगांमधून भाविकांना मंदिरात सोडतात. जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. रात्री टाळ मृदुंगाच्या गजरात व दारु सामानाच्या आतषबाजीत श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरवली देवस्थान कमिटी, गांवकर, मानकरी व आरवली ग्रामस्थांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT