यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला गजबजली आंगणेवाडी! 
सिंधुदुर्ग

Anganewadi Jatra : यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला गजबजली आंगणेवाडी!

दर्शनासाठी 10 रांगांचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

संतोष अपराज

मसुरे : आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या दर्शनाची आस लाखो भक्तगणांना लागली आहे. हाकेला धावणार्‍या, नवसाला पावणार्‍या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मंत्री, खासदार, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सेलिब्रिटी यांसह विविध धार्मिक, क्रीडा , सांस्कृतिक आणि सामाजिक, क्षेत्रातील महनीय व्यक्ती येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरू असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय, जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री भराडी देवी मंदिर परिसर रविवारपासूनच भक्त, चाकरमानी, व्यापारी यांच्या आगमनाने गजबजून गेला आहे.

यात्रोत्सवानमित्त सुवर्ण अलंकार व भरजरी साडी नेसवून मातेला साजशृंगाराने सजविण्यात आले आहे. यात्रोत्सवास व देवीच्या ओटी भरण्यास सोमवारी पहाटे 3 वा. प्रारंभ होणार आहे. मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यात्रा परिसरातील मालवण, मसुरे व कणकवली बस स्टँडनजीक इतर वाहनांची पार्किर्ंंग व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी रात्री 9 ते 12 या वेळेत धार्मिक विधीसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम बंद रहाणार आहे. त्यानंतर पूर्ववत दर्शन खुले होणार असल्याची माहिती अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली. महनीय व्यक्तींसाठी मुख्य स्वागत कक्षालगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दहा रांगांमधून व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT