कुडाळ/देवगड : शिवसेना उबाठा पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवार 17 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहेत. सायंकाळी 6 वा. कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठ येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. तर कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ त्यांची रविवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वा. देवगड कॉलेजनाका येथे सारस्वत बँकेसमोरील पटांगणावर जाहीर प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच मालवण येथे जाहीर प्रचार सभा झाली. त्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही प्रचार सभा कुडाळ येथे झाली. त्यापाठोपाठ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून, माणगाव व देवगड येथे जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. या सभेचे नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.