Arrested Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg Crime : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस दोन वर्षांनी अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषणची पुणे येथे कारवाई; संशयित मोहोळ-सोलापूर येथील

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : अपहरण आणि धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला संशयित विलास संभाजी वसेकर (वय ३५, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे-मोशी येथून ताब्यात घेतलेे. ही कारवाई २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

​कुडाळ पोलिस ठाण्यात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयित विलास वसेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून तो स्वतःचे अस्तित्व लपवून फरार होता. सिंधुदुर्ग एलसीबीचे पथक त्याचा सतत शोध घेत होते.​

दरम्यान, संशयित पुण्यातील मोशी येथील कचरा डेपो परिसरातील कंपनीत काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून पथकाने त्याचा माग काढला आणि २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याला मोशी येथून ताब्यात घेतले. ​

पोलिस चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून २७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT