कणकवली शहरातील आरबी बेकरीसह मेडिकल स्टोअर्सला मोठी आग  File Photo
सिंधुदुर्ग

कणकवली शहरातील आरबी बेकरीसह मेडिकल स्टोअर्सला मोठी आग

आप्पासाहेब पटवर्धन चौकातील बेकरीला पहाटेच्या सुमारास आग

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकात असलेल्या आरबी बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खासगी ऑफिसला आग लागून मोठे नुकसान झाले. आज (शुक्रवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व कुडाळ एमआयडीसी येथे अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना ही आग दिसून आली.

त्यांनी तातडीने बेकरीच्या मागे असलेल्या राजू गौरव गवाणकर यांना उठवून याबाबत कल्पना दिली. त्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आग अधिकच भडकत गेली. त्यात वीज गेल्याने आणखी समस्या येत होती. शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत आर बी बेकर्स यांचा दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअरमधील साहित्याचे ही मोठे नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मालवण नगरपालिकेची अग्निशमन गाडी ही घटनास्‍थळी दाखल झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT