आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला.  आंबोली दरड
सिंधुदुर्ग

आंबोली घाटमार्गात मोठा दगड कोसळला

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली. घटनेनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान - मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT