कासार्डे : दत्तात्रय मारकड
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाच्या हंगामाची अधिकृत घोषणा क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने केली आहे. संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी ५३ खेळांच्या विविध वयोगटांतील स्पर्धांचे आयोजन स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या मागणीनुसार क्रीडा संचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या ऑनलाईन बैठकीत या स्थळांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वर्षीच्या नियोजनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या खेळांचे यजमानपद देऊन क्रीडा संस्कृतीचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कॅरम खेळाचे यजमानपद देण्यात आले आहे.
लढाऊ आणि स्वसंरक्षण खेळ कुस्ती : १७ वर्षांखालील मुले व मुलींचा गट-सोलापूर तर १४ व १९ वर्षाखालील मुलांचा गट-अहिल्यानगर आणि मुर्तीचा गट रायगड. तलवारबाजी : १४ वर्षाखालीलगट-जालना तर १७ व १९ वर्षांखालील मुले-मुलींचे गट-सोलापूर. बॉक्सिंगः १४ व १९ वर्षाखालील गट- अकोला तर १७ वर्षाखालील गट-परभणी.
ज्यूदोः १४ वर्षाखालील गट-वाशिम, तर १७ व १९ वर्षाखालील गट- अकोला.
कराटे व किकबॉक्सिंग : या दोन्ही खेळांचे यजमान वर्धा जिल्ह्याला मिळाले आहे. तायक्वांदो : अकोला येथे तर वुशू स्पर्धा नंदुरबार येथे होतील.
थायबॉक्सिंग : १७ व १९ वर्षाखालील गटांचे सामने नागपुरात होतील.
रॅकेट आणि नेमबाजी खेळ लॉन टेनिसः १४ वर्षाखालील गट-वाशिम, १७वर्षांखालील गट- पुणे आणि १९ वर्षाखालील गट-सोलापूर. सॉफ्ट टेनिस १४ वर्षे गट नाशिक, १७ वर्षे गट-सातारा आणि १९ वर्षे गट-पुणे.
टेबल टेनिसः १४ वर्षाखालील गट-वर्धा, १७ वर्षाखालील गट- परभणी आणि १९ वर्षांखालीलगट- नांदेड. बॅडमिंटन: या खेळाचे सर्व सामने बुलढाणा येथे होतील. स्क्वॉश मुलांचे सर्व गट- वाशिम आणि मुलीचे सर्व गट पुणे.
नेमबाजी (शूटिंग): या खेळाचे सर्व सामने नागपूर येथे होतील.
जलक्रीडा आणि साहसी खेळ जलतरण, डायव्हिंग आणि वॉटरपोलो जलतरण व डायव्हिंगचे सर्व गट आणि वॉटरपोलो (१९ वर्षांखालील मुले) या जलक्रीडा स्पर्धा सोलापूर येथे होतील. सायकलिंग रोड रेस भंडारा येथे तर ट्रॅक सायकलिंग पुणे येथे.
रोलर स्केटिंग व रोलर हॉकीः सर्व गटांच्या स्केटिंग स्पर्धा आणि १९ वर्षांखालील मुलींची रोलर हॉकी पालघर येथे होईल.
जिमॅस्टिक्सः नागपूर येथे तर मल्लखांब स्पर्धा ठाणे येथे.
योगासन: सांगली जिल्ह्याला या स्पर्धेचे यजमानपद आहे.
पारंपरिक आणि नवोदित खेळ
धनुर्विद्या (आर्चरी) १४ वर्षाखालील गट-परभणी, १७ वर्षांखालील गट- अमरावती आणि १९ वर्षाखालील गट-सोलापूर.
बुद्धिबळ : या खेळातील सर्व गटांचे समाने नांदेड येथे होतील. कॅरम या खेळातील सर्व गटांचे सामने सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतील.
बॉल बॅडमिंटन: अकोला येथे, तर बेसबॉल स्पर्धा-सोलापूर. सॉफ्ट टेनिस मुलगे-१४ वर्षे गट- नाशिक, १७ वर्षे गट-सातारा आणि १९ वर्षे गट-पुणे. मुली-१४ वर्षे गट-गडचिरोली, १७ वर्षे गट-जळगाव आणि १९ वर्षे गट-सातारा. डॉजबॉल १७ व १९ वर्षाखालील स्पर्धा बुलढाणा येथे होईल. नेटबॉल १४ वर्षाखालील गट-चंद्रपूर, १७वर्षाखालील गट-यवतमाळ आणि १९ वर्षाखालील गट- नाशिक.
रोलबॉल : १७ व १९ वर्षांखालील गटांचे सामने यवतमाळ येथे होतील. शूटिंगबॉल १७ वर्षाखालील गट बुलढाणा आणि १९ वर्षाखालील गट-यवतमाळ. सॉफ्टबॉल : १४ वर्षाखालील गट गडचिरोली, १७ वर्षाखालील गट धुळे आणि १९ वर्षाखालील गट-जळगाव. रग्बी १४ वर्षाखालील गट सांगली, तर १७ व १९ वर्षाखालील गट- रत्नागिरी. सेपक टकरा मुलांचे सामने वर्धा येथे आणि मुलींचे सामने परभणी येथे होतील. मॉडर्न पेंटॅथलॉन : १७व १९ वर्षाखालील सामने साताऱ्यात होतील.
आट्यापाट्या मुलांचे सामने जळगाव आणि मुर्तीचे सामने वाशिम येथे होतील. टेनिक्वॉईट नंदुरबार व भंडारा येथे. स्पिडबॉल-सातारा येथे, मिनी-गोल्फ नागपूर येथे आणि तेंग- सु-डो स्पर्धा बुलढाणा येथे खेळवली जाईल. प्रतिष्ठित नेहरू हॉकी व सुब्रतो फुटबॉल स्पर्धेच्या १५ व १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या सामन्यांचे यजमानपद पुणे जिल्ह्याला देण्यात आले आहे.
प्रमुख सांघिक आणि मैदानी खेळ तसेच त्यांचे नियोजित ठिकाण-
अॅथलेटिक्स : १४ वर्षाखालील गट- रत्नागिरी, १७ वर्षाखालील गट-पालघर व १९ वर्षाखालील गट-जळगाव.
फुटबॉल : मुलींच्या सर्व गटांचे (१४, १७, १९ वर्षे) सामने अकोला येथे तर मुलांच्या सर्व गटांचे सामने कोल्हापूरात होतील.
क्रिकेट: १४ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षाखालील मुले-मुलीं गट-जळगाव व १९ वर्षाखालील गट-रत्नागिरी.
कबड्डी : मुलगे गट- १४ वर्षे-ठाणे, १७ वर्षे वाशिम आणि १९ वर्षे पुणे. मुली गट-१४ वर्षे-मुंबई शहर, १७ वर्षे-रायगड आणि १९ वर्षे- कोल्हापूर.
खो-खो मुलांचा गट- १४ वर्षे धाराशिव, १७ वर्षे-जालना आणि १९ वर्षे-छत्रपती संभाजीनगर. मुलींचा गट- १४ वर्षे-अहमदनगर, १७ वर्षे रत्नागिरी आणि १९ वर्षे-सातारा.
बास्केटबॉलः १४ व १७ वर्षाखालील गट-यवतमाळ तर १९ वर्षाखालील गट-कोल्हापूर. हॉकी: १४ व १७ वर्षाखालील गटे- बुलढाणा तर १९ वर्षाखालील गट-कोल्हापूर.
व्हॉलीबॉल : १४ वर्षाखालील गट- रत्नागिरी, १७ वर्षाखालील गट- कोल्हापूर आणि १९ वर्षाखालील गट- जळगाव.
हँडबॉल : १४ वर्षाखालील गट- कोल्हापूर, १७ वर्षाखालील गट- वाशिम आणि १९ वर्षाखालील गट-सांगली.