कोकण

सिंधुदुर्ग : भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी! म्हापण येथील 46 पदाधिकार्‍यांचे राजीनामे

मोहन कारंडे

वेंगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून म्हापण येथील भाजपच्या 46 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे व भाजप सदस्य पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे दिले आहेत. माजी पंचायत समिती सदस्यासह ग्रा. पं. सदस्य तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी यांनी राजीनामे दिल्याने येथील भाजपला खिंडार पडली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कामगार आघाडीचे विजय ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य व म्हापण शक्तिकेंद्रप्रमुख गुरुनाथ मडवळ, माजी पं.स.सदस्य गौरवी मडवळ, म्हापण सोसायटी संचालक बाळकृष्ण दाभोलकर, वेंगुर्ला भाजपा युवा उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, बूथ अध्यक्ष सुदेश किनावडेकर, बुथ उपाध्यक्ष मिलिंद म्हापणकर, म्हापण सोसायटी संचालक रवींद्र नांदोस्कर, जगन्नाथ चौधरी, पूजा म्हापणकर, ग्रामपंचायत सदस्य तन्वी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मृणाल मिस्त्री, सुभाष चव्हाण, अंकिता कोनकर, गौरेश ठाकूर, सुदेश तळवडेकर, किशोर खानोलकर, आनंद म्हापणकर, रवींद्र मुंडये, जगदीश म्हापणकर, संदीप खोत, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता सारंग, प्रवीण सारंग, उमेश मोंडकर, उत्तम मोंडकर, खवणे शाखा अध्यक्ष शंभू मोंडकर, विष्णू खोत, काशिनाथ कोचरेकर, मनोज कोचरेकर, ज्ञानदेव खोत, रामचंद्र खोत, इच्छाराम केळुस्कर, खवणे बूथ अध्यक्ष संदीप परब, बूथ अध्यक्ष मळई संजय परब, काशिनाथ परब, रवींद्र परब, शैलेश परब, भीवा परब, नागेश परब, सुरबा परब, प्रवीण परब, नामदेव गावडे, ओंकार परब, सखाराम गावडे, संजोग परब इत्यादींनी आपले राजीनामे दिले आहेत.

भाजपा मच्छीमार सेल जिल्हाध्यक्ष अनंत केळुसकर यांचा राजीनामा

भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनंत उर्फ दादा केळुसकर यांनी आपल्या मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याकडे दिला आहे. वेंगुर्ले नवाबाग येथील अनंत वासुदेव केळुसकर गेली अडीच वर्षे भाजप मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष पदावर होतो मात्र संघटना बांधणीसाठी काम करण्यास अपयश आले. तसेच आपल्या वैयक्तिक कारणानिमित्त पदासाठी काम करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण मच्छिमार सेल जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे जिल्हाध्यक्ष यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT