कोकण

सिंधुदुर्ग: कांदळगावकरांच्या बाप्पाला २१ पदार्थांचा महानैवद्य; आजही परंपरा कायम

अविनाश सुतार

कुडाळ : काशिराम गायकवाड : श्री गणेश चतुर्थी हा कोकणातील लोकांचा आवडता व मोठा सण.  प्रत्येक जण गणेश चतुर्थीचा सण मोठया आनंदाने आणि मोठा आर्थिक खर्च करून आपापल्या गावी उत्साहाने साजरा करत असतो. मग त्यात श्री गणेशाच्या आगमनापासून गणेशाच्या विसर्जनापर्यंतच्या मिरवणुका असो, वा बाप्पांना विविध प्रकारचे नैवेद्य दाखविण्याच्या प्रथा असो. विविध प्रकारचे नैवद्य हे  म्हाणजे भक्तांना वेगवेगळ्या चवींच्या नैवद्य चाखण्याची रेलचेलच. अशीच एक प्रथा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात तारामुंबरी गावामध्ये कांदळगांवकर कुटुंबियांच्या घरच्या गणपतीला २१ प्रकारच्या गोड, तिखट, चविष्ठ पदार्थांचा महानैवेद्य दाखविण्याची आहे.

कांदळगांवकर कुटुंब तारांमुबरी देवगड येथील प्रतिष्ठीत कुटुंब असून तारामुंबरी गावात यांचा मोठा वाडा आहे. जवळजवळ १०० वर्ष जुना असलेल्या या वाड्याचे नुतनीकरण केले असले, तरी जुन्या वाड्याचा लुक मात्र तसाच ठेवण्यात आला आहे. हाच वाडा कांदळगावकर कुटुंबियांचे देवघर आहे. याच ठिकाणी कांदळगावकर कुटुंबातील १४ परिवारांचा एकत्रित गणपती विराजमान होतो. या गणपतीलाच महानैवद्य दाखविण्याची प्रथा आहे. कांदळगावकर कुटुंब आणि घरच्या माहेरवाशिणी एकत्र येत हा महानैवद्य गणेश चतुर्थीच्या पहिल्या ७ दिवसांपैकी एका दिवशी श्रीगणेशास अर्पण करतात. यावेळी संध्याकाळच्या महाआरतीनंतर हा महानैवद्य उपस्थित सर्वांना वाटला जातो.

२१ प्रकारच्या पदार्थांचा महानैवद्याचा पारंपरिक कार्यक्रम यंदा सोमवारी सायंकाळी ७ वाजता उत्साहात संपन्न झाला. यामध्ये घरी बनवलेले बंगाली खाजा, जिलेबी, लाडू, न्हेवरी, कटलेट, उकडीचे मोदक, ढोकळा, कप केक, शेवपुरी, दाबेली, रवाकेक, भाकरवडी, पॅटीस, बालुशाही, खरवस, बटाटा वडा, चकली, चुनकाप, दालवडे, स्प्रिंगरोल, रसगुल्ला, गुलाबजाम, शेवयांची खीर, सँडविच, कॉकटेल आदी जवळपास २४ पदार्थ यावेळी करण्यात आले. सायंकाळी आरती वेळी बाप्पाला हा नैवद्य अर्पण करून उपस्थित सर्वांना वाटला जातो. या कार्यक्रमास कांदळगांवकर कुटुंबातील चार पिढ्यातील सदस्य, पाहुणे, वाडीतील मंडळी उपस्थित होती.

विसर्जन मिरवणूकही लक्षवेधी

श्री गणेश चतुर्थीच्या दिवसापासून ते अनंत चतुर्थीच्या विसर्जनापर्यंत कांदळगावकरांच्या या बाप्पाला अवर्तने, होम, भजन, फुगडी, २१ तुपाच्या दिव्यांची आरास, २१ विविध पदार्थांचा नैवद्य अर्पण, २१ विविध प्रकारचे १०१ मोदक अर्पण, सत्यनारायण महापूजा, म्हामदा इत्यादी कार्यक्रम होत असतात. विसर्जनाची मिरवणूकही लेझीम, ढोल -ताशाच्या गजरात नाचत गाजत भव्य अशी असते. घरातील सर्व स्त्रिया मिरवणुकीला बाप्पाने घातलेल्या वस्त्राच्या रंगाच्याच साड्या नेसतात व सर्वजण फेटा बांधतात. विसर्जनाची अशी भव्य मिरवणूक पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT