रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक खाते  File Photo
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक खाते

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate असे बोगस फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. हे अकाऊंट रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे नाही. यावरुन आलेली मैत्रीची विनंती कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या बोगस खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असून, यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. Collector District Magistrate-Ratnagiri याच अधिकृत खात्यावरुन शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत.फेसबुक वापरकर्त्यांनी, दर्शकांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT