रत्नागिरी : दारूच्या नशेत तरुणाला शिवीगाळ व डोक्यात दगड मारून करत दुखापत करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वा. सुमारास मांडवी ते नाईक कंपनीकडे जाणार्या रस्त्यावर घडली.
आयुष पारकर (रा. राजिवडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात अजय सुभाष तोडणकर (27, रा. चवंडेवठार, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री फिर्यादी अजय तोडणकर व त्याचा मित्र संदीप शिंदे (रा. खडपेवठार) तसेच दत्तात्रय खाडे (रा.एसटी स्टॅण्ड) आणि संशयित आयुष पारकर हे चौघे दोन दुचाकीवरुन नाईक कंपनी ते मांडवी जाणार्या रस्त्यावर गेले. त्याठिकाणी थांबून अजय तोडणकर हा संदीप शिंदेसोबत बोलत होता.
तेव्हा आयुष पारकरने अज्ञात कारणातून दारूच्या नशेत अजय तोडणकरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा अजयने आयुषला तू माझी लायकी का काढली अशी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने आयुषने बाजूचा दगड घेऊन तो अजयच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.