Electric Shock :  (File Photo)
रत्नागिरी

Ratnagiri News : चिपळुणात विजेचा धक्का‍ लागून तरुणाचा मृत्यू

आईला वाचविण्यास गेलेल्‍या तरुणावर घाला

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : कपडे सुकत घालण्याच्या लोखंडी तारेत उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसल्याने आईला वाचवण्यासाठी गेलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली (भुवडवाडी) येथे घडली आहे. अक्षय चंद्रकांत मंगे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खांदाट पाली भुवडवाडीमध्ये शोक व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अक्षय मंगे यांची आई चंद्रकला मंगे या घरातील पडवीत सुकत घातलेले कपडे आणण्यासाठी गेल्या होत्या. पडवीतील लोखंडी तारेला अचानक विजेचा धक्का (शॉक) बसल्याने त्या ओरडल्या. आईचा आवाज ऐकून अक्षय मंगे यांनी तातडीने पडवीत धाव घेतली. तिथे आई जमिनीवर कोसळलेली दिसल्याने अक्षय यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान अक्षय यांनाही विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते जमिनीवर कोसळले. घटनेचा आवाज आणि आरडाओरड ऐकून शेजारील संजय भुवड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अक्षय यांचा श्वास चालू असल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने सकाळी ८.३० वाजता चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अक्षय यांची वैद्यकीय तपासणी केली असता, उपचारापूर्वीच सकाळी ९ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली असून, पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT