चिपळूण : शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे यांनी शिवसेना उबाठा पदाधिकारी व असंख्य शिवसैनिकांसमवेत शिवसेना (शिंदे गट) पक्षात ठाणे येथे शिवसेना पक्षप्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. या सर्वांचे ना. एकनाथ शिंदे व ना. उदय सामंत यांच्यासह नेत्यांनी स्वागत करून शिवसेनेतील पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, दहिवली माजी सरपंच रुपेश घाग आदी उपस्थित होते. दोन वर्ष शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असलेले विनोद झगडे यांनी गेल्या सुमारे दोन महिन्यांपूर्वी शिवसेना उबाठा पक्षाला रामराम ठोकला. यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा सुरू होती. दरम्यान, चिपळूण दौर्यावर आलेले? ? पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व घेतलेल्या आढावा बैठकीच्या पहिल्या रांगेत विनोद झगडे बसले होते. यावेळी ते शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे समोर आले. तसेच काही दिवसांपूर्वी झगडे यांनी रत्नागिरी येथे आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
सोमवारी संध्याकाळी उशिरा ठाणे येथे? ? विनोद झगडे यांनी माजी पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे, प्रसाद लाड, बाळासाहेब शिंदे, सुधीर कदम, सतीश शिंदे, सुरेश गोलमडे सचिन बामणे यांच्यासह? ? साठ पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांसमवेत शिवसेनाप्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे ,राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने यांच्या प्रमुख उपस्थितीत? ? शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करून तुमचा पक्षात मानसन्मान राखला जाईल. तुम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख नेते ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात परिवर्तनाची सुरुवात झाली असून या प्रवेशामुळे चिपळूणमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून पक्षाचे बळ अधिक वाढणार आहे, असे ना.? ? सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.