landslide Veral Ghat | वेरळ घाटात दरड कोसळली 
रत्नागिरी

landslide Veral Ghat | वेरळ घाटात दरड कोसळली

वाहतूक काही काळ खोळंबली; वाहनधारकांची गैरसाेय

पुढारी वृत्तसेवा

लांजा : मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता दरड पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली होती. वेरळ घाटात वाहतूक एकेरी सुरू होती. यामुळे वाहनधारकांची गैरसाेय झाली.

लांजा तालुक्यात दोन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. घाटातील माती-दगड महामार्गावर आल्याने वाहतुकीला अडथळा झाला होता. आठडाभरापूर्वी वेरळ घाटात दरड कोसळली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वेरळ येथे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू होती. दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT