रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या जागी वैदेही रानडे (भा. प्र. से.) यांची नियुक्ती केली आहे.
काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची धाराशिव येथील जिल्हाधिकारी पदावर बढती होऊन बदली झाली आहे. रत्नागिरी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीनंतर या पदाचा वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी आय. ए. एस. दर्जाच्या अधिकार्यांच्या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी
जिल्हा परिषदेला नव्या सीईओ मिळाल्या आहेत. या पूर्वी त्या एमएसआरडीसी मुंबईच्या सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. नव्या सीईओ श्रीमती वैदेही रानडे यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) पदावर सेवा बजावली आहे.