Uday Samant 
रत्नागिरी

Uday Samant : मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची ठाम ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील मोटार ट्रेनिंग स्कूलसमोरील विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा, सॉफ्टवेअरमधील त्रुटी आणि परवानगी प्रक्रियेतील विलंब यावर लक्ष केंद्रित करत ठोस उपाययोजना करण्याचे संकेत दिले. मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशनने प्रशिक्षणासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, एमआयडीसीमधील कमी रहदारीच्या रस्त्यांवर प्रशिक्षणास परवानगी, तसेच अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी मांडली. यासोबतच चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून शासकीय अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व मुद्द्यांवर शासनाकडे प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

नवीन स्कूल मान्यता व नूतनीकरण प्रक्रियेसाठी पनवेल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर अवलंबून राहावे लागत असल्याने होणारा विलंब दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध करण्याबाबतही सकारात्मक भूमिका त्यांनी मांडली.याशिवाय आंबा, काजू आणि मच्छी वाहतूक करणाऱ्या स्थानिक वाहतूकदारांच्या समस्यांकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, 2024 मध्ये स्थापन झालेल्या ‌‘धर्मवीर आनंद दिघे ऑटो रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळा‌’त जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT