Tractor accident news | उतारावरील रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला; चालक ठार, दोन मजूर गंभीर जखमी File Photo
रत्नागिरी

Tractor accident news | उतारावरील रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला; चालक ठार, दोन मजूर गंभीर जखमी

दापोली तालुक्यातील भोईवाडीजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

दापोली : तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरवरील दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ११ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

मृत चालकाचे नाव सुनील बंधन बडाईक (वय २८, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, खेड) असे आहे. तो ट्रॅक्टर (क्र. एमएच-१७-व्ही-४९६) घेऊन भोईवाडीकडून फरारे जंगलजेटीकडे जात होता. उताराच्या रस्त्यावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या अपघातात सुनीलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी ट्रॅक्टरवर बसलेले दोन कामगारही ट्रॅक्टरखाली दबले गेले. सोनाली ऊर्फ शानाबाई तुकाराम चव्हाण (४०) यांच्या डोक्याला, पायाला, कमरेला व मांडीला गंभीर दुखापत झाली असून संतोष दत्तू चौगले (४१) हेही जखमी झाले आहेत. दोघांवर उपचार सुरू आहेत.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

प्राथमिक तपासात मृत चालकाकडे ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना नसल्याचे तसेच वाहन चालवण्याचे तांत्रिक ज्ञानही नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्याचे कर्मचारी अभिजित रामचंद्र पवार यांनी फिर्याद दिली असून मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT