दापोलीत आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर पर्यटकाची पुन्हा हुल्लडबाजी  
रत्नागिरी

Ratnagiri News : दापोलीत आंजर्ले समुद्रकिनार्‍यावर पर्यटकाची पुन्हा हुल्लडबाजी

सूचना फलक लावूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच

पुढारी वृत्तसेवा

दापोली : वारंवार सूचना देऊन आणि सूचना फलक लावूनही पर्यटकांची हुल्लडबाजी थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळी आंजर्ले समुद्रावर एका पर्यटकाने हट्टाने गाडी पाण्याजवळ नेल्याने ती थेट समुद्रात गेली. स्थानिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र संबंधित पर्यटकांनी मदत करणार्‍यांशी उर्मटपणे ‘आमची गाडी समुद्रात गेली तरी चालेल’ असे म्हणत अरेरावी केली. या उद्धट वर्तनामुळे ग्रामस्थांनी मदत करण्यास नकार दिला. अखेर ती गाडी लाटांमध्ये अडकून पूर्णपणे पाण्यात बुडाली. मात्र त्या नंतर ग्रामस्थांनी सौजन्य दाखवून ती गाडी पाण्याबाहेर काढली.

समुद्रकिनार्‍यावरील धोक्यांकडे दुर्लक्ष करून हट्टाने स्टंटबाजी करणार्‍या पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. या बाबत दापोली पोलिसांनी स्टंटबाजी करणार्‍या वाहनांवर कारवाई केली आहे.तरी देखील आशा घटनांना आळा बसत नाही. त्यामुळे कठोर कारवाईची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT