टेम्पो ४० फूट खोल दरीत कोसळला 
रत्नागिरी

Ratnagiri Accident : टेम्पो ४० फूट खोल दरीत कोसळला

मोरवंडे गावाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे गावाजवळ रविवारी (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास भाजी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात चालक आणि त्याच्यासोबत प्रवास करणारा सहकारी सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथून दापोलीच्या दिशेने भाजीपाला घेऊन जाणारा टेम्पो रविवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास मोरवंडे गावाजवळ पोहोचला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो महामार्गालगत असलेल्या सुमारे ३० ते ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT