दापोलीत आढळला व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ 
रत्नागिरी

Ratnagiri News : दापोलीत आढळला व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ

Whale vomit : नागपूरमधील वनविभागाच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविणार

पुढारी वृत्तसेवा

दापोली : तालुक्यातील हर्णे बायपास रोड जवळील समुद्रकिनारी असलेल्या दगडात मंगळवारी (दि.६) दुपारी ५ ते ६ किलो वजनाचा व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ आढळून आला. दापोली पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तो ताब्यात घेतला आहे. ती व्हेल माशाचीच उलटी असल्याबाबत खातरजमा करण्यासाठी तो पदार्थ वनविभागाच्या नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

हर्णे येथील सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी हर्णे येथील निसर्ग हॉटेलसमोरील समुद्र किनारी असलेल्या दगडात व्हेल माशाच्या उलटीसारखा पदार्थ दिसून आला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी ही माहिती पत्राद्वारे वनविभागाला दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, उपनिरीक्षक राजकुमार यादव, परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व त्यांचे सहकारी दुपारी २.३० च्या सुमारास हर्णे समुद्र किनाऱ्यावर पोचले. त्यांना हा उलटी सदृश्य पदार्थ दगडात अडकलेल्या स्थितीत आढळून आला. त्याला मोठया प्रमाणात वाळू लागलेली होती. त्यामुळे तो पदार्थ धुवून पंचनामा करून वनविभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याबाबत साशंकता व्यक्त केली . याची खात्री करण्यासाठी पदार्थ तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT