खेड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांनी पदाचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर दिनांक १ रोजी जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी चंद्रशेखर पाटणे यांची निवड करण्यात आली.
खेड शहरातील मुकादम लॅडमार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी खेड शहर प्रचार प्रमुखपदी खेडचे माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, शहरप्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर पाटणे व उपशहर प्रमुखपदी राजन निर्मळ, खेड शहर सचिवपदी उनमेश उर्फ प्रशांत खातु यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना माजी आमदार संजय कदम यांनी नियुक्ती पत्र दिले.
यावेळी तालुकाप्रमुख संदीप कांबळे, बशीर हमदुले, फुरूस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, महीला शहर संघटिका माधवी बेर्डे तसेच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.