रत्नागिरी : शहरानजीक मिरजोळे-एमआयडीसी येथील प्लॉट क्र. ई-69 येथे सकाळी 10.30 च्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देहविक्रीच्या व्यवसायावर छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले.
एमआयडीसी परिसरात अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. डमी ग्राहक पाठवून छापा टाकल्यानंतर, एक नेपाळी महिला पुण्यातील दोन महिलांकरवी देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले. संशयित नेपाळी महिलेविरोधात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी पुण्यातील दोन महिलांची या व्यवसायातून मुक्तता करण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस निरीक्षक बाबूराव महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक शबनम मुजावर, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेड काँस्टेबल विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, महिला पोलिस हेड काँस्टेबल स्वाती राणे, शितल कांबळे, महिला पोलिस काँस्टेबल पाटील आणि पोलिस नाईक दत्ता कांबळे यांचा समावेश होता.