रत्नागिरी

Ratnagiri Fire : संगमेश्वरातील भंगार गोदामाच्या आगीत ३१ लाखांचे नुकसान

सात तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

पुढारी वृत्तसेवा

देवरूख : संगमेश्वर येथील मारुती मंदिराजवळील भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ३१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. रामविलास पासवान यांच्या मालकीच्या या गोदामाला रविवारी मध्यरात्री १२.४८ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा ३१ लाखांवर पोहोचला आहे.

चार अग्निशमन बंबांकडून आगीची माहिती मिळताच देवरूख येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीची तीव्रता लक्षात घेऊन चिपळूण नगर परिषद, रत्नागिरी एमआयडीसी आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. चार ठिकाणच्या अग्निशमन यंत्रणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मध्यरात्रीपासून सुरू असलेले अग्निशमनाचे प्रयत्न सोमवारी सकाळी सातच्या सुमारास यशस्वी झाले. त्यानंतर गोदामातील साहित्य पुन्हा पेट घेऊ नये, यासाठी काही काळ कूलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले.

प्राथमिक अंदाजापेक्षा नुकसान अधिक

आगीमध्ये गोदामातील भंगार साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुरुवातीला नुकसानीचा अंदाज दोन लाख रुपये व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर ३१ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने ती लगतच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT