Sangameshwar Attempted Murder Case
रत्नागिरी : महिलेचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विनोद भिकू मुदगल (वय ३८, रा. आसावे, कुणबीवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे गळा आवळून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना १४ मे २०२२ सकाळी 8.30 वा. सुमारास आसावे येथे घडली होती. फिर्यादी महिलेचे पती नेहमी प्रमाणे विठ्ठल मंदिर माखजन येथे पूजा करण्यासाठी गेले असताना महिला ही घरात एकटीच होती. त्यावेळी नेहमी काजू बागेत कामासाठी येणारा व सहा महिन्यापुर्वी त्याची आई बरोबर वाद झालेला आरोपी विनोद मुदगल तेथे आला. त्याने महिलेचा गळा पकडला. महिलेने खूप गया वया केली. पण विनोद याने जोरात गळा दाबला. महिलेच्या तोंडातून रक्त बाहेर येवू लागले. तसेच आरोपीने महिलेच्या गळ्याला उजव्या हाताला नखांनी ओरबाडले. त्यावेळी त्यांच्या उजव्या हातातील बांगड्या फुटून त्यांच्या उजव्या हाताला जखम तोडातून रक्त येत असल्याने झालेल्या झटापटीत महिला बेशुद्ध पडली. आरोपीने तेथून पलायन केले.
त्यानंतर घऱातील सासू-पती घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी महिलेला शुद्धीवर आणण्याचा प्रय़त्न केला. त्या शुद्धीवर आला. याबाबत सर्व कुटुंबिय, ग्रामस्थ, गावकार यांनी या प्रकरणी आरोपीकडे चौकशी केली. त्यावेळी आपण हा प्रकार केला नसल्याचे सांगितले. अखेर महिलेने संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रवीण देशमुख करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक केली आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सोमवार १९ जानेवारी रोजी या खटल्याचा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. जिल्हा सरकारी वकील अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी या खटल्यात १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपीला १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.