गणपतीपुळे : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी रविवारी गणपतीपुळे येथे भेट देत स्वयंभू श्रीगणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरात विधिवत पूजाअर्चा करून त्यांनी श्रींचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आगमनामुळे गणपतीपुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजित घनवटकर आणि अमित घनवटकर यांनी सचिन तेंडुलकर यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि तीर्थक्षेत्राची वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकर यांच्या भेटीची गणपतीपुळे परिसरात चर्चा रंगली. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता पाहायला मिळाली.