Teachers News Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : ‘त्‍या’ २४ शिक्षकांच्‍या नियुक्तीला अद्याप ब्रेक!

टीईटी घोटाळ्यातील १३ संशयितांसह दिव्‍यांग, भूकंपग्रस्‍त, प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या कागदपत्रांची होणार पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : पवित्र पोर्टलद्वारे रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेला मिळालेल्‍या ४५७ शिक्षक उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण होऊन त्‍यापैकी ४३३ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मात्र, अद्याप २४ शिक्षकांना अद्याप नियुक्ती पत्र दिलेले नाही. यामध्ये २०१८-१९-२०२०मधील टीईटी घोट्याळीतील १३ संशयित उमेदवारांसह दिव्‍यांग, प्रकल्‍पग्रस्‍त, भूकंपग्रस्‍तातील उमेदवारांचा समावेश आहे. याउमेदवारांना शाळांचे वाटप करण्यात असले तरी त्‍यांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. संबंधितांच्‍या कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची पुण्यात पडताळणी होणार असून तेथून संमती मिळाल्‍यानंतरच नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत तब्‍बल १ हजारहून अधिक पदे ‍ असून पवित्र पोर्टलद्वारे ४७८ शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. सलग तीन दिवस कागदपत्रांची पडताळणी झाली. त्‍यापैकी २१ उमेदवार गैरहजर राहिले होते. त्‍यानंतर २२ सप्टेंबर रोजी ४५७ शिक्षकांचे समुपदेशन होणार होते मात्र काही कारणास्‍तव समुपदेशन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. अखेर २४ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांचे समुपदेशन होवून त्‍यांना शाळा देण्यात आल्‍या.

समुपदेशनानंतर ४३३ शिक्षकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून हे सर्व शिक्षक शाळांमध्ये रूजू ही झाले आहेत. मात्र, उर्वरित २४ जणांना नियुक्तीपत्रे अद्याप दिलेली नाहीत. त्‍यापैकी १३ उमेदवार टीईटी घोटाळ्यातील संशयित आहेत तर उर्वरित प्रकल्‍पग्रस्‍त, दिव्‍यांग, भूंकपग्रस्‍तमधील उमेदवार आहेत. या सर्वांच्‍या कागदपत्रांची तपासणी पुण्याला होणार आहे. तेथून उत्तर आल्‍यानंतर उर्वरित २४ शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्‍याचे शिक्षण विभागाच्‍यावतीने सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT