Ratnagiri Zilla Parishad 
रत्नागिरी

Ratnagiri News : जि.प. ८,८९० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्‍क भरणार

जिल्‍ह्यातील तिसरी, सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २१.१० लाखांचा भार उचलणार; विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता तिसरीआणि सहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग भरणार आहे. जिल्ह्यातील एकूण ८ हजार ८९० विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी २१ लाख १० हजार ६५० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी सरकारने आता शिष्यवृत्तीची रक्कम स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शुल्काची अडचण येणार नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची फी शिक्षण विभागाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण समितीच्‍या बैठकीत ही निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्‍ह्यातील सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांसह विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षा फी भरली जाणार आहे. त्यामुळे विविध सामाजिक प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेवेळी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी १२ लाख ४५ हजार ४२५ रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कासाठी ८ लाख ६५ हजार २२५ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा शुल्काची एकत्रित रक्कम २१ लाख १० हजार ६५० रुपये होते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी मिळते. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे आणि पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून हा खर्च करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT