रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेतील वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यासाठी सुधारीत समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन १४ मे रोजी ठेवण्यात आले आहे. बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, वित्त विभाग, आरोग्य विभागातील ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकारी वैदेही रानडे यांनी पत्रक काढले आहे.
जिल्हा परिषद वर्ग ३, वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या सन २०२६ च्या समुपदेशन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या निर्देशानुसार काही संवर्गाच्या बदल्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित चार विभागातील बदल्या होणार आहेत. त्यापैकी जि.प.च्या बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धन विभागातील सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक तसेच आरोग्य विभागातील आरोग्य सहायक पु., अरोग्य सेवक, आरोग्य सहायक म, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता यापदासंदर्भात स.१० ते ११.३० समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत समुपदेशनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर यासर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.