Crime News Pudhari Photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : तलवारीने केक कापून व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल

रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : वाढदिवसानिमित्त सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणावर रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हर्षराज सुभाष पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हर्षराज पाटील याने २२ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त मिरजोळे पाटीलवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. या प्रकाराचा व्हिडीओ व्हॉटस्‌ॲपवर व्हायरल झाला. हा व्हिडीओ पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर चौकशी करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हवालदार शरद बाबल्या कांबळे (वय ३८, बकल क्रमांक ४२८), नेमणूक रत्नागिरी शहर पोलिस ठाणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT