रत्नागिरीत क्रिकेट खेळताना हृदयविकाराने तरुण खेळाडूचा मृत्यू 
रत्नागिरी

Ratnagiri News : रत्नागिरीत क्रिकेट खेळताना हृदयविकाराने तरुण खेळाडूचा मृत्यू

सोमेश्वर-चिंचखरी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ः तालुक्यातील सोमेश्वर-चिंचखरी येथे क्रिकेट मॅच खेळत असताना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वा. सुमारास तरुण क्रिकेटपटूचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मैदानातच मृत्यू झाला.

प्रवीण बबन पवार (40, रा. गोळप, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या क्रिकेटपटूचे नाव आहे. प्रवीण पवार हे युवा स्पोर्टस्‌‍चे मालक आहेत. शुक्रवारी दुपारी चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात प्रवीण पवार फलंदाजी करत होते. त्यावेळी धाव काढून परत येत असताना ते पंचाच्या समोरच अचानकपणे जमिनीवर कोसळले. प्रवीण पवार जमिनीवर कोसळल्याचे पाहून इतर सहकारी खेळाडूंनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रवीण पवार यांना तपासून मृत घोषित केले. प्रवीण यांच्या अशा अचानकपणे जाण्याने रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील हा काळा दिवस ठरला आहे. प्रवीण हे नेहमी हसतमुख अणि उत्साही स्वभावासाठी ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व होते. तरुण वयात खेळाच्या मैदानावरच जीवनाचा शेवट होणे ही घटना सर्वांनाच हेलावून सोडणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT