मृत्यू 
रत्नागिरी

Ratnagiri Worker Death| ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’मध्ये कामगाराचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा व्यवस्थापनाचा दावा

पुढारी वृत्तसेवा

खेड : तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्यात काम करताना एका कंत्राटी कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१५) रात्री उशिरा घडली. कृष्णा वर्मा असे या कामगाराचे नाव आहे.

कामगाराचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे.

मृत्यूबाबात अधिकृत माहिती नाही

कामगाराला कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. कामगाराच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT