दिवाळीत उन्हाचा चटका; रत्नागिरीकर घामाघूम 
रत्नागिरी

Ratnagiri News : दिवाळीत उन्हाचा चटका; रत्नागिरीकर घामाघूम

पारा ३५ अंशांपार; थंडपेयांना मागणी, ताप-सर्दीच्या रुग्णांत वाढ, पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यात मागील काही दिवसापासून थंडी गायब झाली असून कडक उन्‍ह पडत असल्‍यामुळे जिल्‍हा तापू लागला आहे. उन्‍हाचा पारा ३५ अंशाच्‍या पुढे जात आहे. वाढत्‍या उकाड्यामुळे रत्‍नागिरीकर हैराण झाले आहेत. दिवसा कडक उन्‍ह, संध्यकाळी असा खेळ सुरू आहे. प्रचंड उन्‍हात ही दिवाळीची खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत.दुसरीकडे शेतकरी भातपिकाची कापणी, झोडणी सुरूच आहे.

जिल्‍ह्यात मागील आठवड्यात लांजा, संगमेश्वर, रत्‍नागिरी, दापोलीसह इतर तालुक्‍यात परतीच्‍या पावसाने हजेरी लावली होती. त्‍यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. तर शेतकऱ्यांच्‍या भात पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्‍यानंतर आता काही दिवसापासून पाऊस गायब झाला आहे. दिवसभर कडक उन्‍ह तर सायंकाळी गारवा सुटत आहे. बदलल्‍या हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी रस्‍ते सामसूम होत आहेत.

थंडपेयाकडे नागरिकांची गर्दी

वाढत्‍या उन्‍हामुळे नागरिक आता थंड पेयाकडे वळली आहेत. नारळी पाणी, कोकम सरबत, ताक, ऊसाचा रस, विविध प्रकारचे फळांचे ज्‍यूस, कोल्‍ड्रींक्‍स, आवळा सोडा यासह विविध थंडपेय पीत आहेत.

बदलत्‍या वातावरणामुळे साथीचे आजार

दिवसा कडक उन्‍ह, सायंकाळी गारवा, हवा सुटत आहे. उन्‍ह, सावलीच्‍या खेळामुळे साथीचे आजार वाढत असून सध्या ताप, सर्दीचे रूग्ण वाढत आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयाचे ओपीडी हाऊसफूल्ल होत आहे. त्‍याचबरोबर डेंग्यू, मलेरियाची साथ ही वाढली आहे. डेंग्यूचे रूग्ण ९२ तर मलेरिया २२५ रूग्ण जिल्‍ह्यात आहेत आहे. त्‍यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत डॉक्‍टरांना दाखवावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT