रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाईची समस्या वाढू लागली आहे. चार तालुक्यात तब्बल १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील २५ गावांतील ६४ बाड़धात ४२० पाण्याच्या केल्या होत आहे. पाणीटंचाईन तब्बल २६ हजार ४८५ लोक बाधित झाली आहेत. सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा रानागिरी तालुक्यात होत असून वाड्या, गावांची संख्या ही वाढली आहे. खेड, चिपळूण येथेही फेण्या वाढवण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या झळा लागू लागल्या आहेत. किल्ह्यातील मंडणगड, चिपळूण, खेड, आणि रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक पाण्याची टंचाई भासत असून गावागावात, वाडी बस्त्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, मागील आठवडयात गाये, वाडांची संख्या कमी होती त्यानंतर २० एप्रिलच्या अहवालानुसार पाण्याची टंचाई वाढलेली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २५ गावांतील ६४ चाडपांमध्ये भीषण पाणीटंचाई उदभवली असून त्यांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून त्यापैकी एक शासकीय, १२ खासगी टँकरचा समावेश आहे. मे महिन्यात पाण्याची भीषण अवस्था होणार असून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
या गावे, वाडांना पाणीपुरवठा....
रत्नागिरी-शिरगाव राधाकृष्णनगर तिबंडेवाडी, स्वरूपानंदनगर अजमेरीनगर, आझाद नगर, राजनगर, प्रशांत नगर, नायावनगर, लक्ष्मीनगर, साईभूमीनगर, सहामिन्या-चौसोपीवाडी, गवाणवाडी, मघलावठार, खालचाबठार, आनंद नगर, मिन्याबंदर, खालगाव-बौध्दवाडी मधील गोताडवाडी, जाकादेवी बाजारपेठ, मेवों-वरची म्हादयेवाडी, विठलवाडी, मिरजोळे मथलीबाडी, भक्ती कुंज, एलिना, स्मित प्रथा. नाचणे अदिनाथ नगर, सोमेवश्वर-पांळदेवाडी, गुरवनाडी, खेडशी नवाथे, श्रीनगर, एकतानगर, गणेशनगर, लक्ष्मीनारायणन, मधुरापार्क, सरस्वतीनगर, सौम्यापार्क, मंडणगड तालुका वाल्मीकी नगर, कोंडगाव, भोळवली- देवाचा डोंगर, खेड बोरटोक, बंगळा, खालची धनगरवाडी, चरची धनगरवाडी, भराडेवाडी, धनगरवाडी, भोसलेवाडी, मांगलेवाडी, धनगरवाडी, मोरवाडी. चिपळूण डेरवण-धनगरवाडी, चव्हाणवाडी, कातळवाडी, धनगरवाडी, फुडप-धनगरवाडी, मथलीवाडी, अनारी-कोंडमळा-धनगरवाडी, नारळेवाडी, राडेवाडी, अडरे-धनगरवाडी, सावर्डे-धनगरवाडी, टेरव-धनगरवाडी आदी भागात टँकरने पाणी पुरवता सुरू आहे.