हिवतापावर जिल्ह्याची मात amol NGP
रत्नागिरी

Ratnagiri News : हिवतापावर जिल्ह्याची मात; चार वर्षांत मृत्यू ‌’शून्या‌’वर

रत्‍नागिरी जिल्ह्यात सध्या 18 रुग्ण घेताहेत उपचार; चार वर्षांमध्ये तपासले लाखो नमुने

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : हिवताप मलेरिया या कीटकजन्य आजारावर रत्‍नागिरी जिल्ह्याने प्रभावी नियंत्रण मिळवत गेल्या चार वर्षांत एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही. सातत्यपूर्ण सर्वेक्षण, मोठ्या प्रमाणावर रक्त तपासणी, प्रतिबंधात्मक उपायोजना आणि जनतेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात हिवतापावर यशस्वीपणे मात करण्यात आली आहे. चार वर्षात लाखो नमुने तपासले आहेत. सध्या 18 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

हिवताप हा ॲनाफिलिस मादी डासामुळे पसरतो. स्वच्छ साठवलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होत असल्याने घराभोवती पाणी साचू न देणे, नियमित स्वच्छता राखणे, फवारणीस सहकार्य करणे आणि मच्छरदाणीचा वार करणे अत्यावश्यक आहे. तपासणी आकडेवारीतही सकारात्मक चित्र दिसून येते. 2026 मध्ये काही नमुने घेण्यात आली असून 18 रूग्ण पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

लक्षणे ओळखा, घ्या उपचार हिवतापाची सुरुवात थंडी वाजून ताप येण्यापासून होते. ताप सतत किंवा एक दिवसाआड येतो. तापानंतर अंग गार पडते. डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, अशक्तपणा ही लक्षणे आढळतात. लक्षणे दिसताच विलंब न करता त्वरीत रक्त तपासणी करून घ्यावी. निदान व उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT