रत्नागिरी : शिवसेनेपाठोपाठ रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारी शिवसेना उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली आणि या उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आला.
सोमवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण, संगमेश्वर येथे बैठका घेऊन संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकारी व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, युवक संघटक प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक ममता जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद गटांमध्ये वाटद गटामधून संज्योत सुरेश चव्हाण, खालगाव गटातून विनोद शितप, कोतवडे गटामधून ज्येष्ठ शिवसैनिक व माजी सभापती उत्तम मोरे, झाडगाव म्यु. बाहेर आस्था अमित धांगडे, नाचणेमधून शशिकांत बारगोडे, कर्लामधून विलास भातडे, गोळपमधून विनोद शिंदे तर पावसमधून माजी जि.प. सदस्य व विभागप्रमुख रविकिरण तोडणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हातखंबा गटामधील उमेदवार लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही मा. खा. राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील पंचायत समिती गणासाठी वाटदमधून प्रणाली प्रकाश मालप, कळझोंडीमधून दिक्षा संतोष हळदणकर, खालगावमधून स्वाती वैभव गावडे, करबुडेमधून सुरेश कारकर, नेवरेमधून दिव्यता दत्तात्रय आग्रे, कोतवडेमधून हरिश्चंद्र धावडे, साखरतरमधून आदेश शशिकांत भाटकर, झाडगाव म्यु. बाहेरमधून सुगरा शहानवाझ काझी, केळ्येमधून गौरव सुर्यकांत नाखरेकर, कुवारबावमधून उमेश राऊत, नाचणेतून विजयकुमार ढेपसे, हरचिरीमधून दत्तात्रय गांगण, भाट्येतून किरण रविंद्र नाईक, गोळपमध्ये अविनाश गुरव, पावसमधून सुभाष पावसकर, गावखडीतून कृषा किसन पाटील तर कर्लामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नसिमा डोंगरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या सर्वांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले असून मंगळवार व बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.