रत्नागिरीत जानेवारीमध्ये सागर महोत्सव 
रत्नागिरी

Sagar Mahotsav| रत्नागिरीत जानेवारीमध्ये सागर महोत्सव

वन ओशन, वन फ्युचर बी सिरीयसवर आधारित महोत्सव महिला विशेष म्हणून साजरा होणार

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सागराशी असलेले मानवी जीवनाचे अतुट नाते अधोरेखित करणे व सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी शहरातील आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनच्या वतीने २१ ते २४ जानेवारीदरम्यान पाचवा सागर महोत्सव अर्थात सीव्हर्स २७ आयोजित करण्यात आला आहे. वन ओशन, वन फ्युचर बी सिरीयस या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव विशेषत: महिला विशेष म्हणून साजरा होणार आहे. त्यात विविध क्षेत्रातील महिला तज्ज्ञ‍ व संशोधकांच्या नेतृत्वाखाली सागरी पर्यावरणाचा सखोल वेध घेतला जाणार असल्याची माहिती आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माळनाका येथील एका हॉटेलमध्ये गुरुवारी या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला आसमंत फाउंडेशनचे नंदकुमार पटवर्धन, नितीन करमरकर, पूर्वा भावे यांची उपस्थिती होती. केवळ ४ दिवसांपूर्वीचा मर्यादित न राहता वर्षभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे सागरी संवर्धनाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला जात आहे. या अंतर्गत पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा व रत्नागिरीतील जैवविविधता उद्यानातील वनस्पती व प्राणीमात्रांच्या शास्त्रीय दस्तऐवजीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच गेल्या ४ वर्षातील किनारी अभ्यास फेऱ्यांमधून संकलित केलेल्या दुर्मिळ सागरीची व कीटकांची रंगीत चित्रमय सागरी जैवविविधता फिल्ड गाईड प्रकाशित करण्याचा आणि पथनाट्यांमधून जनजागृती करण्याचा फाउंडेशनचा मानस असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.

महोत्सवात महासागरातील सूक्ष्म प्लास्टिकचे संकट, ब्ल्यू बायोटेक्नॉलॉजी, भारतीय किनारपट्टीवरील सुनामी संवेदनशीलता, सड्यासारख्या किनारी भूरचनेचा वारसा व मँग्रोव्ह संवर्धन यासारख्या विषयांवर महिला शास्त्रज्ञ व अभ्यासक विचार मंथन करतील. मँग्रोव्ह संवर्धनातून स्थानिक महिलांसाठी उपजीविकेच्या संधी, पर्यावरण विषयक लघुपट, बायो एन्झाईमसंदर्भातील सादरीकरण होणार असल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT