जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : रत्नागिरी विभागाच्या वतीने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीसाठी नव्या कोऱ्या बसेस अशा विशेष बस दिल्या होत्या. नोव्हेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 9 आगारातून 931 एसटी बसेस हजारो-लाखो कि.मी. धावल्या. त्यातून रत्नागिरी विभागास तब्बल सरासरी एक कोटी 59 लाख 48 हजार 236 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न डिसेंबर महिन्यात मिळाले आहे. एकंदरीत, शैक्षणिक सहली लालपरीतून करा हा निर्णय, नव्या कोऱ्याबसेस दिल्यामुळे 9 आगार मालामाल झाली आहेत.
हिवाळा हंगामामधील नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने शाळा, महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक, ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षापासून सहली या एसटी बसेसमधून आयोजन करा असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी विभागाच्या एसटी विभागातर्फे नवीन स्मार्ट बसेस ही देण्यात आल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 302 बसेस सहलीसाठी धावल्या आणि त्यातून 47 लाख 10 जार 836 उत्पन्न, डिसेंबर महिन्यात 489 बसेस धावल्या त्यातून 90 लाख 88 हजार 960 उत्पन्न मिळाले तर जानेवारी महिन्यात 140 बसेस धावल्या त्यातून 21 लाख 48 हजार 480 इतके लाखोंचे उत्पन्न मिळाले असे एकूण रत्नागिरी विभागास तब्बल दीड कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, कोकणातील गणतीपुळे, रत्नागिरी शहर, रत्नदुर्ग किल्ला, थिबा पॅलेस, तारांगण, समुद्रकिनारे, मंदिरे, वस्तूसंग्रहालय विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या.
चिपळूण, रत्नागिरी पुढे
शालेय सहलीसाठी सर्वांधिक आरक्षण चिपळूण, रत्नागिरी, खेड आगारातून झाले आहे. त्यातून तर सर्वात जास्त उत्पन्न डिसेंबर महिन्यात 90 लाखाहून अधिक झाले. त्याखालोखाल नोव्हेंबर, जानेवारीत झाले आहे. सर्वात कमी मंडणगडात उत्पन्न झाले आहे. त्यानंतर लांजा, राजापूर, खेड, दापोली, संगमेश्वर, मंडणगड, गुहागर या तालुक्यातून उत्पन्न मिळाले आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या सहलीसाठी यंदा नव्या स्मार्ट बसेस देण्यात आल्या होत्या. तीन महिन्यात 931 बसेस धावल्या. त्यातून दीड कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी विभाग