रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी विभागाकडून जाताना व परतीचे एकत्रित वाहतूक असे जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. कोकणातील रत्नागिरी आगारासह इतर आगारांच्या 3 हजार 307 एसटी बसेस धावल्या होत्या. एकूण दहा लाख 88 हजार 118 किलोमीटर चा प्रवास झाला असून त्यातून रत्नागिरी विभागाच्या एसटीला 5 कोटी 23 लाख 63 हजार 935 इतके उत्पन्न मिळाले आहे. एस.टी. बसेसच्या माध्यमातून लाडका बाप्पा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच पावला.
गणेशोत्सवानिमित्त लाखो कोकणकर कोकणातील आपापल्या गावी आले होते. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी राज्य महामार्ग महामंडळाच्या वतीने 5,200 गाड्या कोकणात सोडण्यात आल्या. त्यापैकी 2930 इतक्या एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. गणपती जादा वाहतुकी बाबत जातानाची वाहतूक 617 फेर्या तून 74 लाख 13 हजार 830 रुपये उत्पन्न मिळाले तर परतीच्या वाहतुकीसाठी 2690 गाड्या मुंबईला धावल्या. आठ लाख 68 हजार 115 एकूण किलोमीटर झाले असून त्यातून चार कोटी 49 लाख 50 हजार 105 इतके उत्पन्न मिळाले. असे जाताना व परतीचे उत्पन्न 5 कोटी 23 लाख 63 हजार 935 इतके झाले आहे. आषाढी वारीत विठुराया पावला होता. त्या नंतर गणेशोत्सवात रत्नागिरी विभागास लाडका बाप्पा पावला आहे.
एकंदरित, गणेशोत्सवात रत्नागिरी आगारासह इतर आगाराने चांगले नियोजन केले. तसेच काहीजणांनी ग्रुपने ही एसटी बुकींग केली होती. भाविकांनी लालपरीतून प्रवास केल्यामुळे एसटी विभागाला चांगला प्रतिसाद मिळाला.
गणपती उत्सवात रत्नागिरी विभागाच्या वतीने जाताना व परतीच्या प्रवासासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. परतीच्या प्रवासासाठी ही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन तिकीट बुकिंग झाले. ज्यादा व परतीची वाहतूक मिळून रत्नागिरी विभागास 5 कोटी 23 लाख 63 हजार 935 लाखांचे उत्पन्न मिळाले.कर्मचारी, अधिकारी यांनी सर्वानी चांगले काम केल्यामुळे हे शक्य झाले.प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी