ST bus service file photo
रत्नागिरी

Ratnagiri News : अखेर आंबा घाटातून एसटी बसेस सुरू

पहिल्या टप्प्यात सकाळी पाच बसेस रवाना

पुढारी वृत्तसेवा

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी-कोल्‍हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात अखेर रत्‍नागिरीतून एसटी बसेसची वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी सकाळी पहिल्‍या दिवशी पाच बसेस सोडण्यात आल्‍या आहेत. उद्या सकाळी ही पाच ते सहा बसेस सोडण्यात येणार आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांचे आदेश आल्‍यानंतर टप्‍प्‍या टप्‍प्‍याने मोठ्या संख्येने एसटी बसेस सोडण्यात येईल. त्‍यानंतर कोल्‍हापूरच्‍या एसटी बसेस रत्‍नागिरी येतील अशी माहिती विभाग नियंत्रक आश्वजीत जानराव यांनी दिली.

रत्‍नागिरी-कोल्‍हापूर मार्गावरील आंबा घाटात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून रस्‍ता खचला असून अनेक ठिकाणी भेगा पडल्‍याने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. एसटी बसेस अणुस्‍कुरा घाटामार्गे कोल्‍हापूरला रवाना होत होत्‍या. आंबा घाटातून एकेरी मार्गेतर वाहने सुरू करा अशी मागणी व्‍यापारी, शेतकरी, वाहतूकदारासह अनेकांनी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT