रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची शुक्रवार, दि. 16 मे 2025 रोजी अपर बृहन्मुंबई येथे पोलिस आयुक्त विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
गेली 2 वर्षे धनंजय कुलकर्णी हेे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये बांगला देशी घुसखोरांच्या बाबतीत ठोस पावले उचलत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मोठी कारवाई केली होती. कुलकर्णी यांच्या बदलीची बातमी आली, तरी त्यांच्या जागी नवीन कोण हजर होणार, हे मात्र उशिरापर्यंत समजू शकलेले नव्हते.