Crime News pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri Crime : शृंगारतळीत क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण; दोघे गंभीर जखमी

गुहागर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गुहागर : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे बियर पिण्यास बसल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी निखिल विजय जानवळकर (वय २९, रा. जाणवले शृंगारतळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.१) सायंकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास निखिल जानवळकर हे त्यांचे मित्र रोशन बाळकृष्ण धामणे आणि ऋतिक नारायण कातळकर यांच्यासह शृंगारतळी येथील राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागे बसले होते. त्यावेळी संशयित आरोपी आदित्य सावंत (वय ३२, रा. मार्गताम्हाणे), दीप शिर्के (वय २६, रा. मुंढर) आणि जीत शिर्के (वय २८, रा. मुंढर) हे तिघे तिथे आले. त्यांनी निखिल व त्यांच्या मित्रांना जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला. त्यानंतर आदित्य सावंत याने लोखंडी रॉडने निखिल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अमानुष हल्ला केला. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुहागर पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT