रत्नागिरी

रत्नागिरी : भरणे येथील श्री काळकाई देवीला मिळणार आता शासकीय सलामी

backup backup

खेड; अनुज जोशी : कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या खेड तालुक्यातील भरणे येथील श्री काळकाई देवीला नवरात्रौत्सव व शिमगा उत्सवामध्ये शासकीय सलामी पोलीस दला मार्फत आता देण्यात येणार आहे. खेडचे सुपुत्र माजी मंत्री रामदास कदम यांनी याबाबत मुख्यमंत्री सचिवालयात पाठपुरावा केला होता. यावर्षी प्रथमच भरणे येथील श्री काळकाई देवीला नवरात्रौत्सवाच्या अखेरीस दसरा कार्यक्रमात मंगळवार दि.२४ रोजी पोलिस पथका कडून शासकीय सलामी देण्यात येणार आहे.

तालुक्यातील भरणे येथे मुंबई-गोवामहामार्गालगत भरणे येथे श्री देवी काळकाईचे मंदिर आहे. काळधर्म निवारणारी ती श्री देवी काळकाई अशी तिची महती आहे. राज्यातील सर्वच भागातून भक्त देवीच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात. श्रद्धास्थान, भक्तांच्या हाकेला धावणारी,नवसाला पावणारी व माहेरवाशिणींची पाठराखीण असलेल्या आदिमाया श्री देवी काळकाईच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाल्या पासून हजारो भाविकांनी येथे भेट दिली आहे. मंगळवारी दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रथमच पोलिस प्रशासनाकडून मानाची सलामी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता श्री काळकाई देवी मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन श्री काळकाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव सुजित शिंदे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT