‘शिक्षक भारती‌’चे जि.प.समोर साखळी धरणे आंदोलन 
रत्नागिरी

Sindhudurg News‌ : ‘शिक्षक भारती‌’चे जि.प.समोर साखळी धरणे आंदोलन

अनुकंपा भरती, वरिष्ठ वेतनश्रेणीसह अन्य मागणीसाठी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : अनुकंपा भरती, वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव आदी विविध मागण्यांकडे प्रशासनसचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या सदस्य शिक्षकांनी गुरुवारी जि. प. प्रवेश द्वारावर साखळी धरणे आंदोलन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

प्रशांत आडेलकर, सुनील मोहन जाधव, विठोबा कडव यांच्यासह शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी संघटनेने प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिक्षकांसाठी अनुकंपा नियम कायम ठेवावा, वरिष्ठ वेतनश्रेणी तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावमंजूर करावेत, कायम मान्यता प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत यासह अन्य काही मागण्यांचे निवेदन जि. प. शिक्षण विभागाला सादर करण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन संघटनेला दिले होते. तथापि, आज अखेर वरील एकाही विषयांबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. तसेच आपल्याकडून कामांच्या बाबतीत पूर्तता झाल्याची माहिती न मिळाल्याने हे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT