शरद पवार file photo
रत्नागिरी

रत्नागिरी: शरद पवार यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ अन् पुन्हा लँडिंंग

Sharad pawar: प्रशासनाची तारांबळ; सुरक्षा रक्षकांना खाली उतरवून हेलिकॉप्टर पुन्हा आकाशात झेपावले

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : वाशिष्ठी डेअरीच्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेलिकॉप्टरने चिपळूणमध्ये दाखल झाले होते. रविवारी ता. 5 रोजी दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा ते हॅलिकॉप्टरने निघाले. यावेळी टेक ऑफ केलेले हॅलिकॉप्टर काही वेळ हवेत थांबवून पुन्हा लॅण्ड करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली.

या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह त्यांचे बॉडीगार्ड, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, प्रशांत पवार व त्यांचे नातेवाईक सहभागी होते. यावेळी पवार यांच्याबरोबर काही भेटवस्तू देखील दिल्या होत्या. यामुळे हेलिकॉप्टरमध्ये अतिरिक्त वजन झाले. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने टेकऑफ केलेले हेलिकॉप्टर पुन्हा लॅण्ड केले आणि बॉडीगार्डना हेलिकॉप्टरच्या बाहेर उतरवून 20 मिनिटांनी शहरातील पवन तलाव येथील मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेतली आणि यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT