Cyber Crime  pudhari photo
रत्नागिरी

Ratnagiri News : ‘एसबीआय योनो’च्या नावाखाली ५.२६ लाखांची फसवणूक

चिपळूण पोलिस ठाण्‍यात अज्ञाताविरुद्ध गुन्‍हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : शहरातील महालक्ष्मी नगर परिसरातील ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची अज्ञात व्यक्तीने ‘एसबीआय योनो’ अ‍ॅपच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची रक्कम परस्पर ऑनलाईन व्यवहार करून लंपास करण्यात आली.

याबाबत कविश्वर कृष्णाजी बापट (वय ८६, रा. योगायोग निवास, महालक्ष्मी नगर, लाड सभागृहासमोर, खेंड-चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी सकाळी ११ ते ८ मार्च दुपारी १२ या कालावधीत हा प्रकार घडला. बापट हे घरी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून आपण ‘एसबीआय योनो’ अ‍ॅपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादीकडून विविध माहिती घेण्यात आली. फिर्यादीच्या सर्व्हीस अकाउंटची माहिती विचारून मोबाईल हॅक करण्यात आला. त्यानंतर खात्यातील उपलब्ध माहितीचा गैरवापर करून एकूण ५ लाख २६,२७९ रकमेचे व्यवहार स्वतःच्या फायद्यासाठी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT