रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याकरिता तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 2025-2030 कलावधीकरिता 847 ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत सोमवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 425 ग्रामपंचायतीत महिलाराज असणार त्यांच्या सरपंचपदासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियमानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तालुकानिहाय सरपंचांची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षांकरिता 2030 या कालावधीत निवडणूक होणार्या ग्रामपंचायतीकरिता आरक्षण तयार केले आहे. त्यासाठी सरपंचपदाची संख्याही निश्चित केली आहे. यानुसार सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. निवडणूक नियमातील तरतुदीनुसार अनूसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी नियमानुसार योग्य तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित करावयाच्या ग्रामपंयातींची निवड करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी त्यांचे अधिकार सर्व तहसीलदारांना प्रदान केले आहेत.