St Bus Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri Accident : साखरपा बसस्थानकात तरुणाच्या पायावरून गेले एसटी बसचे चाक

पायाला गंभीर दुखापत

पुढारी वृत्तसेवा

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानकात एसटी बसच्या पुढील चाकाचा धक्का लागल्याने तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापूर आगाराची चालक महेश चाचणे (रा. हुपरी) आपल्या ताब्यातील रत्नागिरी - कोल्हापूर (एमएच १२ झेडई ८९५३) ही शिवाई गाडी साखरपा बसस्थानकावर फलाटावर लावत असताना मोर्डे लाडवाडी येथील संजय रामचंद्र मांडवकर (३८) याचा तोल गेल्याने एसटीच्या पुढील चाकाचा जोरदार धक्का लागला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल पावसकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले. अपघात कसा झाला, याचा अधिक तपास साखरपा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT