Cattle Smuggling Pudhari File Photo
रत्नागिरी

Ratnagiri News : साडवलीत अवैध गो-वाहतूक रंगेहाथ पकडली

वाहनात दोन, गोठ्यात १५ गुरे आढळली; पाचजण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

देवरूख : नजीकच्या साडवली येथे अवैध व विनापरवाना गुरांची वाहतूक गोरक्षकांनी उघडकीस आणली. एका वाहनातून गुरांची वाहतूक होत असताना संशयितांना पकडण्यात आले. तसेच, लगतच्या गोठ्यात तब्बल १५ गायी-बैल डांबून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले आहे.

साडवली येथील संशयित ठिकाणी एका वाहनात दोन गुरे कोंबलेल्या अवस्थेत आढळली. अधिक पाहणी केली असता जवळच्या गोठ्यात १५ गायी व बैल आढळून आले. पोलिसांनी या सर्व गुरांचा पंचनामा केला. या प्रकरणात साडवलीतील एका स्थानिक व्यक्तीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गो-तस्करी व अवैध गोवंश वाहतुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर गोरक्षक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी देवरुख पोलिस ठाण्यात धाव घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी रोहन बने (माजी जि. प. सदस्य), गणेश गायकवाड, सुशील कदम, उमेश कुलकर्णी, श्रीधन बबाळकुंद्रे, सागर नलावडे, मनीष दळवी यांच्यासह गोरक्षक व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, या गुरांची वाहतूक नेमकी कोणत्या उद्देशाने केली जात होती, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास देवरुख पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT