रत्नागिरी : आरटीईअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 92 शाळा पात्र आहेत. पहिल्या यादीत जिल्ह्यातील 655 विद्यार्थ्यांची यादी लागली असून आतापर्यंत केवळ 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. गुरुवारी प्रवेश घेण्याची शेवटची मुदत असून विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश घ्यावा लागणार आहे.
आरटीई अंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत खासगी शाळातील 25 टक्केराखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील 92 खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणांची संधी मिळत आहे. त्यामध्ये 804 इतक्या रिक्त जागा आहेत. त्यातील 360 जागेवर प्रवेश झाला आहे. अद्याप निम्म्याहून जागा शिल्लक असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. गुरूवारी प्रवेश घेण्यासाठी शेवटची मुदत आहे.
शिक्षणविभागानेही प्रक्रिया गतिमान केली असून उर्वरित जागा भरून काढण्यावर भर दिला जात आहे. पसंतीची शाळा न मिळाल्यामुळे मागील वर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदाच्या वर्षी ही तीच परिस्थिती होती का सर्व जागा भरल्या जातात. याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
आरटीई अंतर्गत 92 शाळा पात्र आहेत. त्या शाळांमध्ये 804 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. पहिल्या यादीत 655 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यापैकी 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आज शेवटचा दिवस असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.-निलिमा नाईक, प्रा. शिक्षणाधिकारी, रत्नागिरी