fish market news 
रत्नागिरी

Ratnagiri News : भर रस्त्यात मासेविक्री महागात; १२ महिलांना दंड

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ मार्गावर सार्वजनिक ठिकाणी मासेविक्री करून परिसरात दुर्गंधी अस्वच्छता पसरवल्यामुळे १२ महिलांना राजापूर न्यायालयाने प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हाक्के यांनी हा आदेश दिला. सर्व महिलांनी गुन्हा कबूल करून२४ हजार रुपयांचा दंड न्यायालयात भरला.

ही घटना १३ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली होती. राजापूर नगर परिषदेने मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही संबंधित महिला शिवाजी पथ ते बाजारपेठ रस्त्यावर माशांची खवले व खराब पाणी टाकल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली होती. याप्रकरणी राजापूर नगर परिषदेचे मुकादम राजन रामचंद्र जाधव यांनी १४ मार्च रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोषारोपपत्र दाखल केले.

या प्रकरणात सुमय्या अब्दुल वासिफ बोरकर, नाजिया इब्राहीम वाडकर, निलोफर एजाज कोतवडकर, आक्सा नुरुद्दीन सोलकर, मिनाज नजीर भाटकर, नजमुन्‍नीसा शब्बीर बोरकर, अनिसा रशीद फणसोपकर, अक्सा अखिल भाटकर, मुमताज तौफीक पिरकर, शबाना सलीम काझी, मुमताज सलीम फरणीस आणि नसरीन यासिन सोलकर या महिलांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला दोन हजार रुपये दंड, अन्यथा सात दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली होती. मात्र सर्व आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत दंडाची रक्कम भरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT